Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ३४

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ३४


माधव जसा सकाळी मुंबईत दाखल झाला तो तसाच गौरवीला भेटण्यासाठी कॉलेजला गेला...

गौरवीला भेटल्यानंतर आणि संध्याकाळी पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत माधव आपल्या घरी आपल्या कुटुंबाला भेटायला गेला...

संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर जेव्हा गौरवी कॉलेजच्या इमारती खाली आली तेव्हा माधव आधीपासूनच आपली बाईक घेऊन तीथे तीची वाट पाहत उभा होता...

माधवला पाहताच गौरवी स्वतःला आवरू शकली नाही...

कॉलेजच्या पायऱ्या उतरताना तिच्या पावलांना जणू पंख फुटले होते… डोळ्यांतला आनंद लपवण्याचा तिने प्रयत्नही केला नाही… ती वेड्यासारखी धावत माधवजवळ येऊन थांबली…

दोघांची नजरानजर झाली... क्षणभर दोघेही काहीच बोलले नाहीत… फक्त एकमेकांकडे पाहत राहिले…
जणू एवढ्या दिवसांचं अंतर त्या एका नजरेत विरघळून गेलं होतं…

“इतक्या लवकर येणार म्हणालास… पण अशी वाट पाहायला लावशील असं वाटलं नव्हतं...,”

गौरवी थोडीशी रुसत..., थोडीशी लटक्या रागात... पण डोळ्यांत अपार प्रेम घेऊन म्हणाली...

त्यावर माधव हसला… आणि म्हणाला...
“वाट पाहायला लावणं चुकीचं आहे खरंतर..., पण एक सांगू... मला ना तुझी वाट पाहणं म्हणजे माझ्यासाठी ती शिक्षाच नाही… तर ती एक सवय झाली आहे...,”
तो हळू आवाजात म्हणाला...

गौरवी काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली…
मग नकळत तिच्या ओठांवर हसू आलं…
आणि डोळे मात्र ओलसर झाले…

माधवने बाईकची किल्ली फिरवली… आणि तिच्याकडे पाहत म्हणाला...,
“चल… आज आपण शब्द कमी वापरायचे..., कारण आपण एकत्र असणं, एकमेकांचा सहवास जास्त हवंय मला…”

गौरवी नेहमीसारखीच लाजत, संकोचत त्याच्या मागे बाईकवर बसली… आणि त्याला पाठीमागून घट्ट मिठी मारुन राहिली...

बाईक पुढे निघाली… आणि वाऱ्यासोबत दोघांच्या मनातली सगळी साठलेली ओढ मोकळी होऊ लागली…

त्या संध्याकाळी ते फक्त भेटत नव्हते… ते पुन्हा एकमेकांकडे
परत येत होते…

संध्याकाळी कॅफेत...

कॅफेच्या काचेपलीकडे संध्याकाळ हळूहळू गडद होत होती…
पिवळसर लाईट्स, हलकीशी संगीताची धून आणि दोन कप गरम कॉफीमधून उठणारा वाफेचा सुगंध…

गौरवी समोर बसलेली होती… दोन्ही हातांनी कप धरून
ती कधी कॉफीकडे..., तर कधी माधवकडे पाहत होती…

“आजही तू शांतच आहेस…”
माधव हलकंसं हसत म्हणाला...

गौरवी नजर खाली घालून म्हणाली...,
“शांत नाहीये मी… फक्त मनात खूप काही आहे…
जे शब्दांत मांडायला मला थोडा वेळ लागतो आहे…”

माधव तिच्याकडे मिश्कीलपणे पाहू लागला…
“मी ऐकायला इथेच आहे… जितका वेळ हवा तितका…”



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all